teachers in school decorated walls of classrooms for students
teachers in school decorated walls of classrooms for students

बंदिस्त वर्गातील भिंती झाल्या बोलक्‍या..'या' शाळेतील शिक्षकांचा अनोखा उपक्रम...  

राजुरा (जि. चंद्रपूर) - कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे.  त्यामुळे  संपूर्ण शाळा बंद आहेत. विद्यार्थी नसल्यामुळे शाळांमध्ये शुकशुकाट आहे. आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माणा झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे शाळा प्रशासनाचीही झोप उडाली आहे. शाळा सुरु नसल्यामुळे शिक्षकांना पगार वेळेवर मिळू शकत नाहीये. मात्र या सर्व समस्यांवर  मात करत चंद्रपूर जिल्ह्यातील एका शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवून इतर सर्व शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

विदर्भात 26 जूनपासून विद्यार्थ्याविना नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. विद्यार्थी शाळेत नसल्यामुळे शाळा ओसाड आहेत. वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविना सुन्न झालेल्या आहेत. मात्र, सुन्न असलेल्या वर्ग खोल्यांना जिवंतपणा देण्यासाठी तालुक्‍यातील देवाडा येथील एकलव्य रेसिडेंशियल स्कूल येथील शिक्षकांनी वर्गात जिवंतपणा निर्माण केला आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यादृष्टीने एकलव्य रेसिडेंशियल स्कूलची स्थापना करण्यात आली. राजुरा तालुक्‍यातील देवाडा येथे 2016 मध्ये निसर्गरम्य परिसरात अद्ययावत एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल निर्माण करण्यात आले. जवळपास तीन हेक्‍टर क्षेत्रात सुसज्ज व सर्व सोयीसुविधा असलेली ईमारत आहे. 

..आणि वर्गाच्या भिंती झाल्या बोलक्या

सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन असल्यामुळे विद्यार्थी घरी आहेत. मात्र, जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील. तेव्हा विद्यार्थ्यांना आपले वर्ग बदललेले दिसावेत, वर्गात जिवंतपणा असावा, भिंती बोलक्‍या असाव्यात या दृष्टिकोनातून येथील शिक्षकांनी अतिशय कल्पकतेतून प्रत्येक वर्गातील भिंतींवर मनमोहक दृश्‍य रेखाटलेली आहे. आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील भिंती अतिशय बोलक्‍या केल्या आहेत. आपल्या कलाकृतीतून शिक्षकाने साकारलेले हे दृश्‍य विद्यार्थ्यांना निश्‍चितच भुरळ घालतील. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत वर्गाची सजावट करण्याचा उपक्रम प्राचार्य रूपा बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिक्षकांनी केला आहे. यात प्रांजली उंदीरवाडे, प्रदीप पेंदोर, सय्यद जाकीर ,राजेंद्र अराक, प्रेमलता बिसेना, नरेंद्र सोळंकी, रुमाना इक्‍बाल ,प्रेरणा ठुबे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. 

शाळेने राबविले अनेक कौतुकास्पद उपक्रम

या विद्यालयात पाचशेपेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. प्राचार्य रुपा बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कोरोना डान्सच्या माध्यमातून मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, नियमित हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. 'निम बाथ' उपक्रमाच्या माध्यमातून लिंबाच्या पानाचे अर्क काढून अंघोळ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चांगल्या आरोग्यासाठी औषधीयुक्त वनस्पतींचे महत्त्व समजावून देण्यात आले. निम बाथ उपक्रमातून आयुर्वेदाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळले.

"लॉकडाउन कालखंडात विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील ऋणानुबंध कायम राहावे यासाठी "स्कूल ऑन व्हील' या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे". 
रूपा बोरेकर, प्राचार्य एकलव्य रेसिडेंशियल स्कूल, देवाडा.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com