Teacher : अबब! गुरुजींनी अवघ्या महिनाभरात लिहून काढली सातशे पुस्तके...एससीईआरटीच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद
CERT initiative to enhance teaching methods : एससीईआरटीच्या उपक्रमांतर्गत राज्यभरातील शिक्षकांनी अनुभवावर आधारित ६९० पुस्तके लेखली, ज्यामुळे मुलांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा होईल.
यवतमाळ : आवडीचे काम मिळाले की, कोणीही उत्साहाने मेहनत करतो. त्याचाच प्रत्यय एससीईआरटीच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शिक्षणक्षेत्र सध्या घेत आहे. वरिष्ठांनी एक आवाज दिला अन् गुरूजींनी अवघ्या महिनाभरात चक्क सातशे पुस्तके लिहून पूर्ण केली.