
वाशीम : सोमवारी (ता. २८) जुलै रोजी होणार असलेली औद्योगिक तंत्रनिकेतनची परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वाशीम काटा मार्गावर सुमारे अर्धा तास रस्तारोको आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती.