Gadchiroli Murder Case: जंगलात कुऱ्हाडीने वार करून अल्पवयीन मुलाची हत्या; गडचिरोलीत धक्कादायक घटना, मैत्रीतून वाद अन् सूड उघड

Minor Accused After Shocking Twist: बहिणीबद्दल आक्षेपार्ह शब्दांवरून मैत्री तुटली; अल्पवयीन मित्रानेच जंगलात नेऊन कुऱ्हाडीने वार करत बादलचा खून, खोटी फिर्याद देऊन पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न उधळला
Forest Horror in Gadchiroli: 17-Year-Old Killed, Accused Tried to Mislead Police

Forest Horror in Gadchiroli: 17-Year-Old Killed, Accused Tried to Mislead Police

esakal

Updated on

गडचिरोली: तालुक्यातील डोंगरगाव परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार (ता. २८) उघडकीस आली. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपीदेखील अल्पवयीन असून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतः फिर्यादी बनत खोटी तक्रार दाखल केल्याचे तपासात समोर आले. मात्र, मोबाईल चॅटिंग, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या चौकशीतून काही तासांतच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. बादल नकटुजी कोसनकर (रा. डोंगरगाव, ता. गडचिरोली), असे मृत मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com