
धाड : बुलडाणा तालुक्यातील सावळी ग्रामपंचायतचे सरपंच तेजराव राणुबा नरवाडे यांना आज २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ता दिनाच्या परेड साठी विशेष अतिथी म्हणून ससपत्नी आमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, बुलडाणाचे उपकार्यकारी मुख्य अधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.