esakal | विदर्भात हे शहर सर्वात हॉट
sakal

बोलून बातमी शोधा

The temperature of the city of Akola increased to 39.5

न्हाळा म्हटले की कपाळावर आठ्या पडणारे अकोलेकर यंदा मात्र तडाख्याच्या उन्हाची वाट पाहत होते. बुधवारी (ता.१) मात्र सूर्य चांगलाच तापला आणि पारा ३९.५ अंश सेल्सिअस वर पोहोचला. परंतु, पावसाचे सावट अजूनही कायम असून, पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.

विदर्भात हे शहर सर्वात हॉट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : उन्हाळा म्हटले की कपाळावर आठ्या पडणारे अकोलेकर यंदा मात्र तडाख्याच्या उन्हाची वाट पाहत होते. बुधवारी (ता.१) मात्र सूर्य चांगलाच तापला आणि पारा ३९.५ अंश सेल्सिअस वर पोहोचला. परंतु, पावसाचे सावट अजूनही कायम असून, पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.

यावर्षी प्रत्येक महिन्यात हजेरी लावणारा पाऊस अजूनही उसंत घ्यायला तयार नाही. यावर्षी मान्सूनचे आगमन जवळपास महिनाभर उशिरा झाले. त्यानंतर मात्र सतत व ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने शेती व नागरी विभाग झोडपून काढला. परिणामस्वरूप अतिवृष्टीची नोंद झाली आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचा लहरीपणा एवढ्यावरच थांबला नाही तर, नोव्हेंबर-डिसेंबर व पुढील प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावून लोकांना हैराण करून सोडले. वातावरणात वेळोवेळी बदल झाल्याने रोगराईचे प्रमाण वाढले.

आता उन्हाळा सुरू झाला मात्र, पाऊस पाट सोडायला तयार नाही. गत आठवड्यात तसेच गेल्या दोन दिवसात पावसाने अकोल्यासह लगतच्या भागात वादळी हजेरी लावली. सतत ढगाळ वातावरण आणि पावसाची हजेरी त्यामुळे हवामानात वेळोवेळी बदल होत आहेत.

हेही वाचा : बुलडाणा येथे आज पून्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे संकट घिरट्या घालत आहे. असे असताना जोरदार ऊन तापल्यास इतर रोगराई व कोरोनाचा प्रादूर्भावही आटोक्यात येईल, अशी अपेक्षा लोकांना आहे. परंतु, कालपर्यंत पावसाचे सावट कायम असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी तापमान वाढल्याने अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हे काय : बाजार समितीमध्ये फक्त गहू आणि तांदूळ!

विदर्भात अकोला हॉट
विदर्भात बुधवारी अमरावती जिल्ह्यात ३९, बुलढाणा ३५.७, ब्रह्मपुरी ३८.५, गडचिरोली ३७.४, गोंदिया ३७.२, नागपूर ३८.६ तर, अकोल्यात सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

येथे अजूनही पावसाचे सावट
सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी तसेच वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी व पश्‍चिम विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.