esakal | शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीमधील काँग्रेसचे आमदार स्वबळाची भाषा वापरत आहे. एक ना अनेक विधान करण्यात येत आहे. अशातच शिवसेनेने (ShivSena) भाजपला चक्क आव्हान दिले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे (Chandrakant ghuse) यांच्यासह भाजपचे विद्यमान दहा नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत (BJP corporators join shivsena) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Ten-BJP-corporators-will-join-ShivSena)

मागील दहा वर्षांपासून विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून सर्वांसमोर आला आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसली तरी सर्वाधिक आमदार भाजपचेच निवडून आले होते. मात्र, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने मिळून सरकार स्थापन केल्याने भाजपला सत्तेपासून मुकावे लागले. जवळपास दीड ते पावणे दोन वर्षांनंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बाँम्ब’मुळे राज्यात शिवसेना आणि भाजपच्यी युतीची चर्चा सुरू झाली होती.

हेही वाचा: कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

मात्र, शिवसेनेने याकडे दुर्लक्ष करीत पक्ष बळकटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचा पहीला वार भाजपवरच केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह विद्यमान दहा नगरसेवक व दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. अस असतानाही भाजपचे १० विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला उघड आव्हानच दिले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बाँम्ब’मुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होईल असे वाटत असताना भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेने आव्हान दिले आहे.

हेही वाचा: सेवानिवृत्त प्राध्यापक करतोय शेतीतून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न

शिवसेनेत प्रवेश करणार असणाऱ्यांचे नाव

 • नगरपालिकेचे उपाध्यक्ष

 • चंद्रकांत घुसे

 • नगरसेवक

 • सतीश ढोबे

 • सुरेश मुंजेवार

 • भास्कर थावरी

 • संगिता वाघमारे

 • नीता ढोबे

 • नीलेश पोगळे

 • सुनिता पचोरी

 • मनीष देवढे

 • मनोज वरघणे

 • बंटी वाघमारे, शहर सरचिटणीस

माजी नगरसेवक (राष्ट्रवादी)

 • प्रतीभा पडोळे

 • देवेंद्र पडोळे

(Ten-BJP-corporators-will-join-ShivSena)

loading image
go to top