तेंदूपत्ता संकलनावर श्वापदांचे सावट; युवकावर अस्वलाचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tendu leaf collection Bear attack on youth woman was attacked by Wild boar chandrapur

तेंदूपत्ता संकलनावर श्वापदांचे सावट; युवकावर अस्वलाचा हल्ला

चंद्रपूर : सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील युवक तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेला होता. त्याच्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. तसेच कोठारी येथील महिलेवर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात दुबारपेठ हे गाव येते. या गावातील गोपाल दिवाकर आत्राम हा तरुण कुटुंबासह तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. तेंदूपत्ता गोळा करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्याच्यावर झेप घेत जखमी केले. त्याने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे त्याच्यासोबत असलेले धावून आले. गोपाल जखमी अवस्थेत होता. त्याला तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना रविवारी घडली.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील शोभा जगदीश तोडे (वय ५०) ह्या आपल्या सहकारी महिलांसोबत जंगलात गेल्या होत्या. दरम्यान, रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सोबत असलेल्यांनी त्यांना कसेतरी वाचवले. शोभा तोडे यांना कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे.

वाघ, बिबट्याची भीती

सध्या जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांत वाघ, बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. मागील आठवड्यात नागभीड तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. वनविभाग नागरिकांना सूचना करीत आहे. मात्र, नागरिक दुर्लक्ष करून वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात जाऊन तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.

Web Title: Tendu Leaf Collection Bear Attack On Youth Woman Was Attacked By Wild Boar Chandrapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top