esakal | 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ : सोहलच्या खुनानंतर परिसरात तणाव निर्माण

मृत सोहेलला गुन्हेगारी वर्तुळातील 'माया'चे आकर्षण होते. मायाच्या राहणीमानानुसारच सोहेल स्वत:चे स्टेट्‌स फेसबूक, सोशल मीडियावर ठेवत होता. मित्रमंडळीतही मायाभाई म्हणूनच त्याला ओळखले जात होते.

'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतताळ : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता.23) रात्री साडेनऊ वाजतादरम्यान दारव्हा मार्गावरील लोहारा येथील देशी दारूच्या दुकानासमोर मुख्य रस्त्यावर घडली. या झटापटीत मारेकरीदेखील जखमी झाला असून, त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

सोहेल बिसमिल्ला खान (वय 21, रा. देवीनगर) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ जावेद बिसमिल्ला खान (वय 28, रा. उद्योगनगर, लोहारा) याने लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सोहेलचे घरी पटत नसल्याने तो देवीनगरात वेगळा राहत होता. मंगळवारी सोहेलच्या मित्रांनी घटनेची माहिती जावेदला दिली. मारेकरी व सोहेल यांच्यात जुना वाद होता. वर्चस्वाच्या मुद्यावरून अनेकदा त्यांच्यात संघर्ष झाल्याचे सांगितले जाते.

असे का घडले? - पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून केली धुलाई; पर्समध्ये होत्या आक्षेपार्ह वस्तू...

याच कारणातून मंगळवारी रात्रीदरम्यान संशयित गणेश कानोडे, दुर्गादास चौहान, प्रकाश रासकर, विनय ऊर्फ आनंद पाल यांनी संगनमत करून सोहेलचा निर्घृण खून केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. सोहेलवर हल्ला करताना विनय ऊर्फ आनंद पाल हा देखील झटापटीत जखमी झाला. त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले.

मृत सोहेल स्वत:ला 'माया भाई' म्हणून परिसरात मिरवत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तीन मारेकरी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

जाणून घ्या - पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

स्टेट्‌सही फिल्मी स्टाइल

मृत सोहेलला गुन्हेगारी वर्तुळातील 'माया'चे आकर्षण होते. मायाच्या राहणीमानानुसारच सोहेल स्वत:चे स्टेट्‌स फेसबूक, सोशल मीडियावर ठेवत होता. मित्रमंडळीतही मायाभाई म्हणूनच त्याला ओळखले जात होते. त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे नातेवाइकांनी त्याला बाहेरगावी पाठविले होते. मात्र, परत आल्यावर पुन्हा त्याचा पूर्ववैमनस्यातून वाद झाला आणि यातच गेम झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळातून ऐकायला मिळाली.