पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून केली धुलाई; पर्समध्ये होत्या आक्षेपार्ह वस्तू...

अनिल कांबळे
Monday, 22 June 2020

नोकरीतून बदली झाल्यामुळे विनोद आणि प्रांजली नागपुरात आले. काही दिवसांतच पिंकीसुद्धा मुंबईतून नागपुरात धडकली. प्रांजलीने योगायोग समजून दुर्लक्ष केले. परंतु, तोपर्यंत विनोद आणि पिंकीचे प्रेम प्रकरण खूप पुढे गेले होते. दरम्यान, विनोदची बदली नाशिक येथे झाली. यादरम्यान पिंकीसुद्धा नाशिकच्या कंपनीत नोकरीला लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मात्र प्रांजलीला संशय आला. 

नागपूर : कार्यालयातील केबीनमध्ये पतीला प्रेयसीसोबत अश्‍लील चाळे करताना पत्नीने रंगेहात पकडले. यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून चांगली धुलाई केली. प्रेयसीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीलाही मार खावा लागला. शेवटी हे प्रकरण अजनी पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी पती-पत्नी आणि युवतीच्या संबंधाबाबत शहानिशा करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची अजनीमध्ये चांगलीच चर्चा होती. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि प्रांजली (बदललेले नाव) हे दोघेही उच्चशिक्षित युवक आणि युवती. दोघांची 2006 ला फेसबूकवरून ओळख झाली. दोघांनी मैत्री केल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर दोघांनीही कुटुंबीयांच्या सहमतीने 2008 ला प्रेमविवाह केला. विनोद हा एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीर होता. प्रांजली ही खासगी कंपनीत काम करीत होती. 

हेही वाचा - काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

कंपनीत तिची पिंकी नावाच्या युवतीशी ओळख झाली. ऑफिसमधील मैत्री घरापर्यंत पोहोचली. पिंकी आणि प्रांजलीचे संबंध निर्माण झाले. दोघीही एकमेकांना आपापले सुख, दुःख सांगायला लागले. प्रांजलीने पती विनोदशी पिंकीशी ओळख करून दिली. तेव्हापासून ती दोघांचीही फॅमिली फ्रेंड झाली. एका वर्षानंतर विनोदची बदली मुंबईला झाली. त्यामुळे प्रांजली आणि विनोद मुलासह मुंबईला राहायला गेले. 

मात्र, काही दिवसांतच तेथे पिंकीसुद्धा नोकरीच्या शोधात धडकली. कुणीही ओळखीचे नसल्यामुळे पिंकी प्रांजलीकडे राहायला लागली. त्यादरम्यान विनोद आणि पिंकीचे प्रेम फुलले. दोघांचे वॉट्‌सऍप आणि फेसबूकवरून चॅटिंग होत गेली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची प्रांजलीला खबरही नव्हती.

अधिक माहितीसाठी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

मुंबईवरून गाठले नागपूर

नोकरीतून बदली झाल्यामुळे विनोद आणि प्रांजली नागपुरात आले. काही दिवसांतच पिंकीसुद्धा मुंबईतून नागपुरात धडकली. प्रांजलीने योगायोग समजून दुर्लक्ष केले. परंतु, तोपर्यंत विनोद आणि पिंकीचे प्रेम प्रकरण खूप पुढे गेले होते. दरम्यान, विनोदची बदली नाशिक येथे झाली. यादरम्यान पिंकीसुद्धा नाशिकच्या कंपनीत नोकरीला लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मात्र प्रांजलीला संशय आला. 

फायनान्स कंपनी स्थापन

विनोदने पुन्हा नागपुरात परत येत मानेवाडा रोडवर एक फायनान्स कंपनी उघडली. मोठे ऑफिस आणि स्वतंत्र कॅबीनही त्याने बनविली. मात्र, विनोद घरी कमी आणि कार्यालयातच जास्त राहायला लागला. त्यामुळे प्रांजलीने विनोदचा मोबाईल तपासला तर तिला काही आक्षेपार्ह रेकॉर्डिंग आढळल्या. संशयाचे भूत मानगुटीवर बसल्याने तिने पती आणि मैत्रीण पिंकीवर नजर ठेवली.

क्लिक करा - 'प्लान बी'सुद्धा तयार ठेवा; या नवनियुक्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला कानमंत्र

कार्यालयात पकडले रंगेहात

विनोद कार्यालयात गेल्यानंतर तासाभरातच प्रांजली भाऊ आणि बहिणीसोबत विनोदच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कॅबिनमध्ये चक्‍की पती आणि पिंकी अश्‍लील चाळे करताना आढळून आले. तसेच पिंकीच्या पर्समध्ये आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या. त्यामुळे चिडलेल्या प्रांजलीने पिंकीचे केस धरून बाहेर काढले. तिची जबरदस्त धुलाई केली. तिचा बचाव करण्यासाठी आलेल्या पतीच्याही कानशिलात लगावली. तिघेही अजनी ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणाची खमंग चर्चा परिसरात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the wife washed her husband's girlfriend at Nagpur