esakal | भयंकर! तक्रार केली म्हणून घरावर हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात पोलिसांना घटनेची माहिती देताना जानकीनगरातील नागरिक.

भयंकर! तक्रार केली म्हणून घरावर हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धार्मिक प्रार्थना स्थळावर सुरू असलेल्या अवैध प्रकरणांची पोलिसांत तक्रार दिली म्हणून प्रमोद घारपुरे यांच्या घरावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला चढवला. ही घटना हुडकेश्‍वर भागात येणाऱ्या जानकीनगर परिसरात घडली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जानकीनगर भागात 20 वर्षांपासून प्रार्थना केंद्राच्या नावाने धार्मिक संघटना काम करते. या कामात यापूर्वीही अनेक अवैध काम सुरू होते. हे काम बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे. मुळात हा संघर्ष काही वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत असून, ही बाब आमदार सुधाकर कोहळे यांच्या लक्षात आणून दिली. मात्र, अवैध प्रकार थांबत नसल्याने काही दिवसांपूर्वी आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नेतृत्व करणारे प्रमोद घारपुरे यांच्यावर प्रार्थना केंद्र चालविणाऱ्यांचा रोष होता. याच वादातून प्रार्थना केंद्र चालविणाऱ्या गटाने घारपुरे यांच्या घरावर हल्ला चढविल्याचा आरोप जानकीनगर येथील नागरिकांनी केला आहे.

loading image
go to top