esakal | जिल्हा बँक निवडणुकीत छप्परफाड मतदान; उद्या मतमोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

amaravti

जिल्हा बँक निवडणुकीत छप्परफाड मतदान; उद्या मतमोजणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांनी तसेच दिग्गजांच्या उमेदवारीने लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमवारी झालेल्या (ता. चार) निवडणुकीत छप्परफाड मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी 95 टक्के मतदानाची नोंद झाली असून मंगळवारी (ता. पाच) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे चिखलदरा, मोर्शी तसेच तिवसा तालुक्यामध्ये तर 100 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने कुणाला कौल मिळणार?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून दिग्गजांची धाकधुक वाढली आहे. 22 संचालकांच्या जिल्हा बँकेत चार जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने सोमवारी 18 जागांसाठी मतदान झाले.

अमरावती व भातकुली तालुक्याचे मतदान अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल केंद्रावर घेण्यात आले. या केंद्रावर अनेक दिग्गज मतदानाच्या वेळी उपस्थित राहिल्याने साहजिकच कार्यकर्त्यांचा जोशसुद्धा वाढला होता. त्यामुळे या केंद्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.उ

सहकार पॅनेलचे प्रवर्तक बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, परिवर्तन पॅनेलचे संस्थापक संजय खोडके, आमदार सुलभा खोडके यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी दिवसभर या मतदान केंद्रावर उपस्थित होती. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. चांदूरबाजार तसेच अन्य काही तालुक्यांत अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळाले. सकाळपासूनच मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. दुपारी चार पर्यंत सरासरी 91.52 टक्के मतदान झाले होते.

उद्या मतमोजणी

जिल्हा बँकेच्या बहुप्रतिक्षीत निवडणुकीच्या मंगळवारी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातील सभागृहात सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर पाच, असे 70 मतमोजणी कर्मचारी राहतील. सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे लावण्यात येतील, त्यानंतर मोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

या दिग्गजांच्या भाग्याचा होणार फैसला

राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हापरिषद अध्यक्ष बबलू देशमुख, संजय खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार राजकुमार पटेल, माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे आदी दिग्गजांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी होईल.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

अमरावती 91, भातकुली 93, नांदगाव खंडेश्वर 96, चांदूररेल्वे 98, धामणगावरेल्वे 98, तिवसा 70, मोर्शी 100, वरुड 98, अचलपूर 83, दर्यापूर 87, चांदूरबाजार 93, अंजनगावसुर्जी 84, चिखलदरा 100, धारणी 96

loading image
go to top