esakal | गडचिरोतील नवेगाव येथे घरी आढळला पती-पत्नीचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोतील नवेगाव येथे घरी आढळला पती-पत्नीचा मृतदेह

गडचिरोतील नवेगाव येथे घरी आढळला पती-पत्नीचा मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिराेली) : तालुक्यातील वेलगूर ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या नवेगाव गावात पती व पत्नीचा मृतदेह राहत्या घरात शुक्रवारी (ता. १८) आढळून आला आहे. जनार्दन लचमा कोटरंगे (वय ५०) व पोचूबाई जनार्दन कोटरंगे (वय ४७) असे मृतांचे नाव आहे. (The-bodies-of-the-couple-were-found-at-Navegaon-in-Gadchiroli)

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पती व पत्नी मजुरीचे काम करीत होते. जनार्दन यांनी पाच दिवसांपूर्वी गावकऱ्याकडून कामासाठी सायकल मागितली होती. मात्र, ती परत न केल्यामुळे सायकल मागण्यासाठी तो इसम गेला असता त्यांना शुक्रवारी सकाळी धक्कादायक दृश्य दिसले. दोन्ही पती व पत्नीचा मृतदेह राहत्या घरी दिसून आला. पतीचा मृतदेह फाट्याला लटकून होता तर पत्नीचा मृतदेह खाटेवर पडून असलेल्या अवस्थेत होता.

हेही वाचा: ‘हिरोशिमा-नागासाकी’सारख्याच भयंकर ‘वणी’च्या वेदना

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. लागलीच मृताच्या मुलाला घटनेची माहिती दिली. मृताचा मुलगा त्याच्या सासरला कामानिमित्त गेला होता. घटनेची माहिती होताच तो गावी आला व अहेरी पोलिस स्टेशनला माहिती दिली. अहेरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. पोलिस तपासानंतरच घटनेची अधिक माहिती मिळणार, असे अहेरीचे पोलिस निरीक्षक डांगे यांनी सांगितले.

(The-bodies-of-the-couple-were-found-at-Navegaon-in-Gadchiroli)

loading image
go to top