esakal | पैनगंगा नदीपात्रात महिलेसह युवकाचा मृतदेह आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह

पैनगंगा नदीपात्रात महिलेसह युवकाचा मृतदेह आढळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पैनगंगा नदीपात्रात एका महिलेसह युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पारवा पोलिसांना महिलेची ओळख पटविली. तर, युवकाची ओळख पटू शकली नाही. सोनाली संदीप चिंचोलकर (रा. ब्रांदा, ता. वरोरा), असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा: नागपूर: शहराचा रिंगरोड फुलझाडांनी बहरणार

महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून दोघांनी उडी घेतल्याची घटना बुधवारी (ता.एक) उघडकीस आली होती. पर्समध्ये असलेल्या फोटोवरून दीर-भावजय असल्याची खात्री पटली होती. पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबविली. अखेर दोन्ही मृतदेह पारवा पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या पैनगंगा नदीपात्रात आढळून आले. महिलेची ओळख पटली असली तरी सदर मृतदेह हेमंत चिंचोलकर याचा आहे की, नाही हे स्पष्ट झाले नाही. पुढील तपास ठाणेदार गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

loading image
go to top