
धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीवरून विहिरीत पडून मृत्यू (Falling into a well) झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे काही काळ येथील ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) व उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला. ‘समृद्धी’च्या कंत्राटदाराने मृताच्या कुटुंबास तीन लाख रुपयांची भरपाई दिल्याने वाद निवळला. (The family refuses to accept the bodies Amravati crime news)
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील सुनील तायडे हे शनिवारी भाऊ व मुलगा रोशन तायडे यांच्यासह नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस हायवेवरील पूल क्र. १०६ नजीक महामार्ग संरक्षक भिंतीचे पोल टाकण्याचे काम करीत होते. तहान लागल्याने रोशन जवळच्याच शेतातील निमार्णाधीन विहिरीतील पाणी आणण्यासाठी गेला. मात्र, तोल गेल्याने पाय घसरून तो विहिरीत पडला होता.
शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जिल्हा बचाव पथकाने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला होता. मात्र, रविवारी कुटुंबीयांनी नुकसानभरपाईची मागणी करून मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. ग्रामीण रुग्णालयात दत्तापूर येथील पोलिस तळ ठोकून होते.
तीन लाखांची आर्थिक मदत
घटनेचे वृत्त कळताच माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी लगेच समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराशी चर्चा करून तायडे यांच्या कुटुंबास तातडीने नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आग्रह धरला. दुसरीकडे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी लगेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून तायडे कुटुंबीयांची भेट घेऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तायडे कुटुंबीयास कंपनीतर्फे तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. सायंकाळी उशिरा युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
The family refuses to accept the bodies Amravati crime news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.