अमरावतीतून ‘टेकऑफ’च्या हालचालींना वेग; जबाबदारी एमएडीसीकडे

अमरावतीतून ‘टेकऑफ’च्या हालचालींना वेग; जबाबदारी एमएडीसीकडे
SUPERUSER

अमरावती : अमरावती येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येथून विमानांचे टेकऑफ लवकरच होणार असल्याचे मानले जात आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची जबाबदारी शासनाने एमएडीसीकडे सोपवली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-७२ किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. येथे रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. (The-flight-will-start-from-Amravati)

विमानतळाचा उडान आरसीएस या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत उडान ३.० मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाइन्स यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी मिशनमोडवर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएडीसी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामांना गती द्यावी लागणार आहे.

अमरावतीतून ‘टेकऑफ’च्या हालचालींना वेग; जबाबदारी एमएडीसीकडे
शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!

अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. त्यांनी मंगळवारी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आवश्यक निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल. याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच होईल. एमएडीसीचे अधिकारीही उपस्थित असतील. आवश्यक तो सर्व निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. एटीआर-७२ विमाने उतरण्याची सुविधा व नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी एमएडीसीकडून राईटस् लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.

अमरावतीतून ‘टेकऑफ’च्या हालचालींना वेग; जबाबदारी एमएडीसीकडे
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

धावपट्टीची लांबी वाढली

धावपट्टीची लांबी १३७२ मीटरवरून १८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे काम प्रगतिपथावर आहे. महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे तसेच बडनेरा- यवतमाळ वळणरस्त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येणार आहे.

(The-flight-will-start-from-Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com