
अमरावती : ‘द काश्मीर फाइल्स’ बघितल्यानंतर तणावसदृश परिस्थिती
परतवाडा (जि. अमरावती) : द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटावरून राजकारणही केले जात आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. दुसरीकडे आम्हाला चिडवण्यासाठी चित्रपट करमुक्त केल्याचे बोलले जात आहे. अनेकांकडून चित्रपटाचे समर्थनही केले जात आहे. अशात चित्रपट बघितल्यानंतर दोन गट आमोरासमोर आल्याची घटना अमरावतीमध्ये घडली.
अचलपूर येथील श्री. सिनेमागृहामधून मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजताच्या सुमारास द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट बघून काही युवक नारेबाजी करीत आझादनगर लालपूल परिसरात पोहोचले. त्यामुळे संतप्त झालेला दुसराही गट रस्त्यावर उतरला. दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकल्यामुळे एकाला मारहाण करण्यात आली. त्यांच्यात वाद झाल्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली (Tension in two groups in Amravati) होती.
हेही वाचा: ‘...तर देशात आणखी मोठे शेतकरी आंदोलन व्हायला वेळ लागणार नाही’
मारहाण सुरू असतानाच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुख लोकांसोबत चर्चा केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दोन गटातील लोकांना ठाण्यात आणून चौकशी केली. नारेबाजी आणि त्यानंतर झटापट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनास्थळावरून काही लोकांना अटकसुद्धा करण्यात आली.
पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर दोन्ही गटातील दहा ते बारा जण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी व जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच योग्य दखल घेतल्यामुळे (Police intervention) निर्माण झालेला तणाव पहाटेपर्यंत पूर्णतः निवळला.
हेही वाचा: मोठी बातमी : IPL २०२२ Tickets विक्री या दिवशीपासून
नारेबाजी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर उभे ठाकले. त्यांच्यात मारामारी झाली नाही. केवळ शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने वाद क्षमला.- अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक, अमरावती
Web Title: The Kashmir Files Tension In Two Groups In Amravati Police Intervention Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..