Chandrapur | सर्वांत वृद्ध वाघाचा मृत्यू; ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the oldest tiger in maharashtra waghdoh dies at chandrapur Sinhala forest Tadoba Tiger Project
Chandrapur : सर्वांत वृद्ध वाघाचा मृत्यू; ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध

सर्वांत वृद्ध वाघाचा मृत्यू; ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध

चंद्रपूर : चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात सर्वांत वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला. तो सतरा वर्षे वयाचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालविल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या.

त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता. २१ मे रोजी सिनाळा येथे गुरख्याचा मृत्यू झाला होता. तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. सोमवारी (ता. २३) सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत आहेत. एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

Web Title: The Oldest Tiger In Maharashtra Waghdoh Dies At Chandrapur Sinhala Forest Tadoba Tiger Project

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top