esakal | सिंदेवाहीवरही तयार होऊ द्या एखादा 'दंगल'
sakal

बोलून बातमी शोधा

सिंदेवाहीवरही तयार होऊ द्या एखादा 'दंगल'

'गाव तिथे क्रीडा संकुल' हे शासनाचे धोरण असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात मोजकेच क्रीडा संकुल आहेत.

सिंदेवाहीवरही तयार होऊ द्या एखादा 'दंगल'

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

चंद्रपूर: २०१६ मध्ये आमिर खानचा दंगल चित्रपट प्रदर्शित झाला. कमालीची जिद्द असलेला एक बाप ढोर मेहनत घेऊन कुस्ती स्पर्धेसाठी आपल्या 'गीता' आणि 'बबिता' या मुलींना तयार करतो. मग याच मुली कुस्तीत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवितात. अमाप प्रसिद्धी मिळविलेल्या या चित्रपटातून खेळाप्रती जिद्द, चिकाटी आणि मेहनत असली की यश नक्कीच मिळते, ही बाब अधोरेखित करतो. परंतु एक-दोन नव्हे तर तब्बल डझनभर कन्यांनी राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवूनही सिंदेवाही तालुक्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज क्रीडा संकुल नाही.

हेही वाचा: बाबू अच्छेलाल यांनी केली चंद्रपूर अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी

'गाव तिथे क्रीडा संकुल' हे शासनाचे धोरण असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात मोजकेच क्रीडा संकुल आहेत. उर्वरित अनेक क्रीडा संकुल अपूर्णच आहेत. निधीची टंचाई, क्रीडा विभागाचे दुर्लक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था यासाठी कारणीभूत आहे. सिंदेवाही तालुक्यात फार वर्षांपूर्वी तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले. गावात जागा उपलब्ध असतानाही चार ते पाच किलोमीटर अंतरावर गडमौशीच्या जंगल परिसरात हे क्रीडासंकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: चंद्रपूर, ब्रह्मपुरीनंतर सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात

आठ हेक्टर परिसरात हे क्रीडासंकुल उभारण्यात आले. परंतु हे क्रीडासंकुल जंगलव्याप्त परिसरात असल्याने चार-पाच वाजेनंतर क्रीडासंकुलाकडे कुणी फारसे फिरकत नाही. आतातर शेतकऱ्यांनीच क्रीडासंकुलावरच अतिक्रमण केले. त्यामुळे ज्या उद्देशाने हे क्रीडासंकुल उभारले गेले त्या उद्देशालाच हरताळ फासला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात हे गाव येत असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण करावे. चांगल्या सुविधा मिळाल्यास सिंदेवाहीतही नक्कीच एखादा 'दंगल' घडेल.

हेही वाचा: चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या गोवरी खाणीत अपघात; चार गंभीर जखमी

बाबू अच्छेलाल म्हणाले, गोंडपिपरीहून सिंदेवाहीला जाण्यासाठी बसस्थानक गाठले. बराच वेळ वाट पाहूनही बस आली नाही. चौकशी केली असता सिंदेवाहीला जाण्यासाठी कमीच बसेस असल्याचे समजले. बराच वेळानंतर बस मिळाली आणि गोंडपिंपरी ते सिंदेवाही प्रवास सुरू झाला. 'सकाळ'चे सिंदेवाही येथील तालुका बातमीदार विलास धुळेवार यांनी 'रिसिव्ह' केले. बसस्थानकाजवळील हॉटेलात चहा, नाश्ता घेतला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे गृहक्षेत्र असलेल्या सिंदेवाही तालुक्यात अनेक कामांचे भूमिपूजन झालेले दिसले. नगरपंचायतची प्रशस्त इमारत, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर प्रकर्षाने लक्ष वेधून घेत होते. सिंदेवाही नगर खेळाडूंचे माहेरघर आहे. मात्र, गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर जंगलव्याप्त परिसरात क्रीडांगण आहे. तेथे सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे पोलिस, वनविभाग आणि सैन्य विभागात भरतीची आशा बाळगून असलेले खेळाडू मिळेल तेथे सराव करतात. क्रीडांगणाअभावी खेळाडूंची गैरसोय होत असल्याने याच 'व्हायब्रंट' मुद्यावर अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही क्रीडासंकुलाकडे निघालो.

हेही वाचा: चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवा; केंद्रीय आरोग्य पथकाचे निर्देश

आठ एकरसाठी २५ लाखांचा निधी

लोणवाही आणि सिंदेवाही या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे दोन्ही गावे मिळून एक ग्रामपंचायत करावी, अशी मागणी फार जुनी आहे. त्या मागणीला यश आले. आता सिंदेवाहीत नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र, लोणवाहीत ग्रामपंचायतच अस्तित्वात आहे. या गावात २००२ रोजी क्रीडा संकुल मंजूर झाले. त्यासाठी सिंदेवाहीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील गडमौशी मार्गावर क्रीडा संकुल मंजूर झाले. जवळपास आठ हेक्टर क्षेत्रात हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार होते. त्यासाठी राज्य शासनाने २६ मार्च २००३ रोजी २५ लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर टप्याटप्प्याने निधी मंजूर झाला. २००९ रोजी ७५ लाख मिळाले आणि त्यानंतरही निधी मंजूर झाला.

हेही वाचा: सावधान! एप्रिल-मे महिन्यात सर्वाधिक उष्ण लहरी; नागपूर @ ४०.२; चंद्रपूर विदर्भात ‘हॉट’

इनडोअर सभागृह, बास्केटबॉल कोर्ट

जिल्हा क्रीडा संकुलासाठी प्राप्त निधीतून २०११ ते २०१५ या काळात इनडोअर सभागृह, ४०० मीटर रनिंग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, क्रीडा साहित्य, पाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, संरक्षण भिंत, बॅडमिंटन कोर्ट यावर जवळपास ६७ लाखांचा निधी खर्च झाला. तालुका क्रीडा संकुल समितीच्या खात्यात जवळपास ३३ लाख रुपये शिल्लक आहेत. पालकमंत्री तसेच तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून खनिज विकास निधी अंतर्गत ५५७.१४ लाख रुपये मंजूर झाले. या निधीतून उर्वरित मैदान, प्रेक्षक गॅलरी, संरक्षण भिंत, इनडोअर गेम, हॉलचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी; मात्र, काँग्रेस नगरसेवकाच्या घरून १०० पेटी दारूसाठा जप्त

निधीचा योग्य विनियोग करणार

खनिज विकास निधीअंतर्गत पाच कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याअंतर्गत ग्राउंड उभारणे व इतर कामे केली जाणार आहेत. निविदा मंजूर झालेली असून, आर्किटेक्ट नेमलेले आहेत. लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल.

-संदीप उईके, क्रीडा मार्गदर्शक तथा सचिव तालुका क्रीडा संकुल समिती, सिंदेवाही

हेही वाचा: आला उन्हाळा! नागपूरसह विदर्भात उन्हाची तीव्र लाट; चंद्रपूर जगातील दुसरे 'हॉट' शहर 

रखडलेले बांधकाम व्हावे पूर्ण

सिंदेवाहीसारख्या ग्रामीण भागातील हॉकी खेळाडूंनी घेतलेली राष्ट्रीय स्तरापर्यंतची झेप सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या गावातील खेळाडूंनी हॉकी, बास्केटबॉल, फूटबॉल, कबड्डी व धनुर्विद्या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व केले. काही प्रतिभावंत खेळाडू संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सिंदेवाही गावाची शोकांतिका म्हणजे या गावात क्रीडापटूंना सरावासाठी क्रीडा संकुल नाही. गडमौशी मार्गावर बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलात कोणत्याही सुविधा नाही. सिंदेवाही तालुका क्रीडा संकुलाचे काम अद्याप अर्धवट आहे. संकुलाची पाहणी करून अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. तालुका क्रीडा अधिकाऱ्याचे पद भरावे.

-डॉ. राहुल धारगावे, सचिव व क्रीडा मार्गदर्शक, सिंदेवाही तालुका हॉकी असोसिएशन, सिंदेवाही

loading image