चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी; मात्र, काँग्रेस नगरसेवकाच्या घरून १०० पेटी दारूसाठा जप्त

100 boxes of liquor confiscated from Congress corporators house Chandrapur news
100 boxes of liquor confiscated from Congress corporators house Chandrapur news

चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरी मुंबई येथील उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकला. त्यांच्या घरून शंभर पेटी दारू जप्त करण्यात आली. ब्रह्मपुरी शहरातील पेठ वॉर्ड परिसरात असलेल्या त्यांच्या घरी बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

ब्रह्मपुरी शहरातील काँग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे हे दारू तस्करी करीत असल्याचा संशय होता. या संशयाच्या आधारे मुंबई येथील उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने बुधवारी त्यांच्या घरी छापा टाकला. त्यांच्या घरी असलेल्या संशयित स्कॉर्पिओ वाहनासह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक असलेले महेश भर्रे हे अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा होती. परंतु, राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती. यावर उपाय काढण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील विशेष पथकामुळे ही कारवाई शक्य झाली. महेश भर्रे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नगरसेवक भर्रे कारवाईच्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजकीय दबावामुळे होत नव्हती कारवाई

काँग्रेसचा हा नगरसेवक अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सहभागी असल्याची चर्चा होती. परंतु, राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती. पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाई झाली. महेश भर्रे आणि एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा नगरसेवक कारवाईच्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे सध्या अटक करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com