esakal | क्या बात है! विदर्भाच्या या तीन खेळाडूंची आयपीएलसाठी निवड; अबुधाबीला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

these 3 players from vidarbha are going for playing IPL 2020

आगामी आयपीएलसाठी अनुक्रमे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नेट बॉलर म्हणून निवड केली आहे.

क्या बात है! विदर्भाच्या या तीन खेळाडूंची आयपीएलसाठी निवड; अबुधाबीला जाणार

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : गेल्या मोसमात घरगुती सामन्यांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण व चमकदार कामगिरीचे फळ विदर्भाच्या सौरभ दुबे, आदित्य ठाकरे व नचिकेत भुते या तीन युवा क्रिकेटपटूंना मिळाले आहे. या तिघांचीही आगामी आयपीएलसाठी अनुक्रमे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नेट बॉलर म्हणून निवड केली आहे.

देशविदेशातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली 13 वी आयपीएल स्पर्धा येत्या 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातच्या अबुधाबी येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सौरभची रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघात, आदित्यची विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात, तर नचिकेतची के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघात नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

मध्यमगती गोलंदाज असलेला सौरभ 

21 वर्षीय डावखुरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या वर्ध्याच्या सौरभ दुबेने 2018-19 मध्ये झालेल्या कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाकडून उत्कृष्ट प्रदर्शन करीत नऊ सामन्यांमध्ये 35 गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर बांगलादेशविरुद्ध झालेल्या 23 वर्षांखालील मालिकेसाठी निवड झाली होती. याशिवाय बांगलादेशमध्ये आयोजित एमर्जिंग आशिया चषकातही त्याला संधी मिळाली होती. यावर्षी इंदूरमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या विदर्भ संघाचाही तो सदस्य होता. सहा फूट पाच इंच उंच सौरभ सध्या माजी कसोटीपटू झहीर खानच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे.

अकोल्याच्या आदित्यने वेधले माईक हेंसन यांचे लक्ष

21 वर्षीय अकोल्याच्या आदित्यनेही आपल्या कामगिरीने आरसीबीचे माईक हेंसन यांचे लक्ष वेधले. आदित्यने ज्युनिअर क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर रणजी करंडकातही चार सामन्यांमध्ये 21 बळी टिपून अमीट छाप सोडली होती. त्याने सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतही आठ सामन्यांमध्ये 46 गडी बाद केले होते. एमर्जिंग आशिया चषक आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो सदस्य राहिला आहे.

महत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...

रेशीमबाग जिमखानाचा नचिकेत होणार पंजाबचा 

रेशीमबाग जिमखानाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या उंचपुऱ्या डावखुऱ्या नचिकेतने 2018-19 मध्ये खेळल्या गेलेल्या कुचबिहार करंडक स्पर्धेत सर्वाधिक 55 गडी बाद केले होते. त्याने तब्बल सहावेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपले होते. याशिवाय त्याने गतवर्षी सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतही पाच सामन्यांत 15 गडी बाद केले होते. माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू नरेंद्र भुते यांचा तो मुलगा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ