हे आहेत मेडिकलचे नवे प्रभारी अधिष्ठाता; डीएमईआरचे आदेश धडकले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

धुळ्याच्या मेडिकल कॉलेजच्या छाती रोग विभागाचे प्रमुख डॉ. शिवहरी घोरपडे हे सहा महिन्यापूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर रुजू झाले. त्यानंतर ते मंगळवारी (31 मार्च) सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नव्या अधिष्ठाताच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे हे मंगळवारी (ता.31) सेवानिवृत्त होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मेडिकलचे नवे अधिष्ठाता म्हणून डीएमईआरने येथीलच जीएमसीच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमूख डॉ. अपूर्व पावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उल्लेखनीय असे की, डॉ. अपूर्व पावडे हे मेडिकलचे अधिष्ठाता होणार असल्याचे भाकीत ‘सकाळ’ने (ता.31) मार्च रोजीच्या अंकात वर्तविले होते.

हेही वाचा- या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही; आतापर्यंत 30 निगेटीव्ह

‘सकाळ’ने यापूर्वीच वर्तविले होते भाकीत
धुळ्याच्या मेडिकल कॉलेजच्या छाती रोग विभागाचे प्रमुख डॉ. शिवहरी घोरपडे हे सहा महिन्यापूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर रुजू झाले. त्यानंतर ते मंगळवारी (31 मार्च) सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नव्या अधिष्ठाताच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामध्ये येथीलच मेडिकल कॉलेजच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा प्रभार दिल्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने 31 मार्च रोजी जारी केले आहेत. उल्लेखनीय असे की, मेडिकलचे अधिष्ठाता पदाचा प्रभार डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडे जाणार असल्याचे भाकीत ‘सकाळ’ने यापूर्वीच वर्तविले होते. 

क्लिक करा- आता ग्रामीण भागात आयसोलेश वार्ड

कोण आहेत डॉ.पावडे?
मुळातच विदर्भाच्या मातीशी नाळ जोडून असलेले डॉ. अपूर्व पावडे हे मुळचे वर्ध्यांचे. त्यांचे शिक्षण मेडिकल कॉलेज नागपूर येथून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर, अंबेजोगाई, नागपूर, गोंदिया त्यांतर 2014 साली अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये ईएनटी विभागाचे प्रमूख म्हणून पदभार स्विकारला. तसेच गोंदिया मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदाची प्रभार त्यांनी सांभाळला. एकंदरीतच उत्कृष्ट प्रशासक, मनमिळावू स्वभाव. ‘ग्रुप वर्किंग’, सर्वांना सोबत घेऊन चालणाचे त्यांचे कौशल्य, पारदर्शक प्रतिमा यामुळे ते मेडिकलचे नेतृत्व सक्षमपणे करणार असल्याने संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. 

तर डॉ. कुसुमाकर होतील डीन?
विश्‍वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार डीएमईआरने जरी डॉ. अपूर्व पावडे यांच्या निवाला पसंती दिली असली तरी, डॉ. पावडे यांच्याकडून प्रकृतीचे कारण पुढे करून पदभार नाकारल्या जाणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. कुसुमाकर घोरपडे यांची अधिष्ठाता पदावर वर्णी लागण्याचीही शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the new in charge of the medical establishment; The DMER order