अकोला शहरात हे रस्ते आहेत बंद!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोला शहरातील संख्या दोनवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता संचारबंदीचे सर्व नियम कडक केले असून, शहरातील रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सीमा आखून देण्यात आल्या असून, या भागात संचारबंदीचे काटेकोर पालन केले जात आहे. 

अकोला : कोरोना विषाणूचे दोन रुग्ण अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आढळल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी अकोला तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अकोला तालुक्यात येण्यास व येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील बांधित रुग्णांच्या परिसरानुसार सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरात दोन स्तरीय नियंत्रण सीमा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिल्या नियंत्रण सीमेमध्ये संचारबंदीत निश्‍चित काळासाठी व्यवहार सुरू राहतील तर दुसऱ्या नियंत्रण सीमेमध्ये संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली असून, परिसर सिल करण्यात आले आहे. 

 

 

असा असेल नियंत्रण परिसर
नियंत्रण सीमा (संपूर्ण शहर) ः डाबकी रोड रेल्वे गेट, बाळापूर नाका, शिवर बायपास, वाशीम बायपास, पाचमोरी अकोट फैल, दमाणी हॉस्पिटल (आपातापा रोड), गुडधी रेल्वे गेट, खरप रेल्वे गेट, खडकी बायपास, मलकापूर एमआयडीसी रेल्वे गेट, महाबीज प्रक्रिया केंद्र (शिवणी चौक), पोलिस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस), नायगाव रोड.

 

पहिली नियंत्रण रेषा (अंतर्गत) ः  १) बैदपुरा ः गांधी चौक, फतेह चौक, दाऊदभाऊ कादरभाई पेट्रोलपंप, तेलीपुरा चौक, कच्ची मशिद.

२) अकोट फैल ः बिलाला मशिद, भिम चौक, साबरिया चौक, नायगाव कब्रस्थान. 

 

दुसरी नियंत्रण रेषा ः सिटी कोतवाली चौक, अकोला मनपा मुख्यालय, बस स्थानक चौक, टॉवर चौक, अग्रेसन चौक, अकोला रेल्वे स्थानक, अकोट रोड, तीन टॉवर, नायगाव कब्रस्थान, तारफैल, देशमुख फैल, शिवाजी पार्क, अकोट स्टॅंड चौक, लक्कडगंज रोड, मरकज बडी मशिद. 

याठिकाणी आहेत बॅरिगेटस्
बैदपुरा ः महावितरण कार्यालय किराणा मार्केट, गणपती मंदिराजवळील खंगारपुराकडे जाणारी गल्ली, मानेक टॉकीजजवळील गल्ली रॉयल बेकरी टी पॉईंट, दीपक चौक, ए.आर. गॅरेज गल्ली, वर्षा मेडिकल गल्ली, चांदेकर चौक, मनपा चौक, ॲक्सेस बँक जवळील गल्ली, माळीपुरा चौक (तेलीपुरा रोड), दामले चौक, कलाल चाळ (नाईस कलक्शन गल्ली), कृष्णद्वार समोरील गल्ली, कालाचबुतरा समोरील गल्ली, भंगार गल्ली, फतेह चौक, अकोट स्टँड चौक जवळील गल्ली (आदर्श सलून), गांधी चौक, बियाणी चौक.

 

अकोट फैल : राजकमल चौक, मातानगर होमीओपॅथीकची गल्ली, ॲड.मोहता याचे घराजवळील गल्ली, देशमुख फैलकडे जाणारी गल्ली, नितीन बिछायतची गल्ली, जयकिसना मच्छी मार्केटची डाबी व उजवीकडील गल्ली, मटकाबाजार बाजूची गल्ली, महेश प्रोव्हिजन जवळील गल्ली, चिंतामणी मेडिकलची गल्ली, नाना उजवणे गोडावून जवळील गल्ली, उमेश किराणा शॉप,  आयुर्वेदिक हॉस्पिटल गल्ली, बॉम्बे आॅटो गॅरेज जवळील गल्ली, डॉ. सपकाळ क्लिनिक जवळील गल्ली, सादिक हार्डवेअर समोरिल गल्ली, कुरेशी कॉलनी कडील गल्ली, मस्तान चौक, 1600 प्लॉटमधील सर्व गल्ली, फतेमा हॉस्पिटलकडे जाणारी व रोडवरील सर्वा गल्ली, राजीव गांधीनगरमधील सर्व गल्ली, भारतनगर, भोला चौक, अकोट पैल पोलिस स्टेशनच्या बाजूला साधना चौक, मौलाना अब्दुल कलाम चौक, जाफराबाद मना अकोट रोड, भिमनगर चौक, रेल्वे अंडरपास रस्ता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These roads are closed in Akola city!