घुग्घुस येथे त्यांनी केले चक्क वाहनावर अंत्यसंस्कार
घुग्घुस (जि. चंद्रपूर) : कोरोनाने नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या-व्यवसाय ठप्प झाले आहेत. लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि अशावेळी पेट्रोल-डिझेल दरवाढ घोषित झाल्याने सामान्य नागरिकांना अधिकच फटका बसला आहे. त्याचा राग जनतेच्या मनात आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. आता हळूहळू टाळेबंदी हटविण्यात येत आहे. रोजगाराच्या शोधात निघालेल्या नागरिक, व्यापाऱ्यांना डिझेल, पेट्रोल दरवाढीचा फटका बसत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ घुग्घुस येथे मंगळवारी (ता. 3) कॉंग्रेसने अभिनव आंदोलन करीत स्प्लेंडर या दुचाकी वाहनावर अंत्यसंस्कार केले.
देशात कोरोना विषाणुमुळे मागील तीन महिन्यांपासून टाळेबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली होती. सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, रोजगार पूर्णतः ठप्प झाले होते. याचा फटका गोरगरीब, मध्यमवर्गीयांना बसला. आता हळूहळू टाळेबंदी हटविण्यात येत आहे.
उपासमारीच्या संकटाशी तोंड देत नागरिक आता रोजगाराच्या शोधात निघाले आहे. मात्र, त्यांना डिझेल, पेट्रोल यांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मागील सोळा दिवसांपासून देशात दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे किराणा मालाच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे.
सविस्तर वाचा - हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन...
मंगळवारी पेट्रोलचे दर 86.58 पैसे, तर डिझेलचा दर 76.67 दर इतके आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ घुग्घुस शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज ूरेड्डी यांच्या नेतृत्वात स्प्लेंडर दुचाकीचा अंत्यसंस्कार विधी करून प्रतीकात्मक स्वरूपाचे अभिनव आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, अजय उपाध्ये, विशाल मादर, शहजाद शेख, अंकुश सपाटे, कल्याण सोदारी, संजय कोवे, रोशन दंतलवार, रणजित राखुंडे यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.