esakal | चोरट्यांनी 65 लाखांचे दागीने केले लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

चोरट्यांनी 65 लाखांचे दागीने केले लंपास

sakal_logo
By
प्रकाश गुळसुंदरे

परतवाडा (जि. अमरावती) : सदर बाजार येथील ईश्वर पन्नालाल ककराणिया (अग्रवाल) यांचे ज्वेलरीचे दुकान शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान फोडून चोरट्यांनी 60 ते 65 लाखांचे दागीने लंपास केले. चोरटे पांढऱ्या रंगाच्या वाहनातून आले होते. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडताना बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी तिजोरीतील दागीने चोरून दुकानातील संगणकमधील डीव्हीआरसुद्धा चोरन नेले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना श्‍वान पथकामार्फत सपासणी सुरू केली आहे.
शहरातील सदरबाजार परिसरात असणाऱ्या ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल यांच्या सराफा प्रतिष्ठान वर रात्री अडीच तीनच्या सुमारास धाडसी चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी या दुकान तोडून तबल 50 ते 60 लाख रुपयांचे दागिने लंपास केला तर केडिया किराणा स्टोअर ,खंडेलवाल कृषी केंद्र  सर्योदय मेडिकल याचे दुकानातही चोरी झाली आहे. शहरात चोरीच्या घटना थांबता नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल सराफा प्रतिष्ठान असून पन्नालाल ककराणिया यांचा दागीने गहानचा व्यवसाय आहे. काही दिवसा आधी व्यापारी विवेक अग्रवाल यांच्याकडे सशस्त्र पडला होता त्या दरोड्यातील आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यात शहरात चोरीचे सत्र सुरु असतांनाच पुन्हा आज पुन्हा पन्नालाल ककराणीया (अग्रवाल )यांच्याकडे पडलेल्या दरोडयासह आदी तिन दुकानात झालेल्या चोऱ्यांनी  शहर पुन्हा हादरले असुन व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याकरिता वरिष्टांनी चोरांचा तातडीने बंदोबस्त लावावा अशी मागणी व्यापाऱ्यासह  नागरिकाकडूून होत आहे.
...
एलसीबी, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड यांना आमंत्रित केले असून ककराणी यांच्या दुकानातील चोरी गेलेल्या मालाची नोंदी घेणे सुरु आहे.  तातडीने नाकाबंदी करण्यात आली तर सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे एक टिम जिल्हा बाहेर तर काही इतर भागात चोराचा शोध घेणे सुरु आहे.
- पी.जे.अब्दागिरे ,
उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर

loading image
go to top