Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

आठवड्यात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ; अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सलग घटनांनी प्रशासनासमोर सुरक्षेचे व आरोग्यसेवेचे प्रश्न उभे
Amravati Jail news

 Amravati Jail news

sakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

अमरावती, : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आठवड्यात तिसऱ्या बंदीचा मृत्यू झाला. सदर बंदी शिक्षाधीन बंदी होता, असे कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले. शनिवारी (ता. १२) सदर बंदीचा उपचारादरम्यान सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दलीराम गुलाब राठोड (वय ६८, रा. वडगाव जंगल, जि. यवतमाळ), असे मृत बंदीचे नाव असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षकांनी दिली. या बंदीला एका गुन्ह्यात २२ मे २०२६ रोजी यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षे शिक्षा सुनावली होती. त्याला शिक्षा उपभोगण्याकरिता अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात आणल्या गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com