Crop Insurance : एकतीस हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers crop insurance

Crop Insurance : एकतीस हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण नाही

यवतमाळ : खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. असे असले तरी तब्बल ३१ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षणच झाले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दाखल तक्रारींपैकी ५९ हजार तक्रारी नाकारल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे फेरसर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.

यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पीकविमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. याबाबत तक्रारी होत्या. ज्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. त्यांचे फेरसर्वेक्षण होणार आहे. पीकविमा काढलेल्या तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

-नवनाथ कोळपकर, कृषी अधिक्षक, यवतमाळ