esakal | संत भास्कर महाराजांचे हजारो भक्तगणांनी केले पुण्यस्मरण, घरोघरी झाले श्री ज्ञानेश्वरी पारायण
sakal

बोलून बातमी शोधा

sadguru maharaj.jpg

शेगाव संस्थेद्वारा येथे दरवर्षी भास्कर महाराज पुण्यतीथीचा भव्य कार्यक्रम पार पडतो. श्रींचे दर्शनार्थ भाविक येथे दिंड्या पताकासह मोठ्या संख्येने हजेरी लावतात

संत भास्कर महाराजांचे हजारो भक्तगणांनी केले पुण्यस्मरण, घरोघरी झाले श्री ज्ञानेश्वरी पारायण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) : शेगांवकर योगी सम्राट सद्गगुरू श्री गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री भाष्कर महाराज यांचा 113 वा संजीवन समाधी सोहळा अर्थात पुण्यतिथी महोत्सव भक्तगणांनी आपले निवासस्थानीच साजरा करून सद्गगुरू महाराजांचे भावपूर्ण पुण्यस्मरण केले. श्री संत भास्कर महाराज संस्थान येथे दरवर्षी हजारो भाविकांचे उपस्थितीत भास्कर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडतो. 

परंतु यावर्षी कोरोना आपत्तीमुळे लाकडाउनच्या पाश्वभूमीवर पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गुरु-शिष्य परंपरेतील भक्तश्रेष्ठ भास्कर महाराजांनाअडगांव बु नजिक द्वारकेश्वर क्षेत्री सद्गुरु श्री गजानन महाराजांनी स्वहस्ते समाधी दिली होती. माऊली ज्ञानेश्वर महाराजानंतर संजीवन समाधी म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्यसाधारण महत्व आहे. संत वासुदेव महाराजांनी या समाधी स्थळाचा जिर्णोद्वार करुन श्री भास्कर महाराज संस्थान स्थापन करुन हे संस्थान सर्वांर्थाने पुढे नेले. आयुष्याच्या अंतिम काळात हे संस्थान श्री गजानन महाराज संस्थान शेगांव कडे विलीन केले.

हेही वाचा - बापरे घरात घुसून गळ्यावर लावला कोयता अन्य...

शेगाव संस्थेद्वारा येथे दरवर्षी भास्कर महाराज पुण्यतीथीचा भव्य कार्यक्रम पार पडतो. श्रींचे दर्शनार्थ भाविक येथे दिंड्या पताकासह मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोरोना आपत्तीमुळे यावर्षी पुण्यतिथी महोत्सव रद्द झाला असला तरी भास्कर महाराज नगर, श्री क्षेत्र श्रद्धासागर, गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर संस्थान अकोली जहागीर, संत वासुदेव महाराज वैष्णव मंदीर वडाळी, ज्ञान भास्कर आश्रम वारी भैरवगड, गुरुमाऊली निवासस्थान आदी ठिकाणी पुण्यतिथी निमित्त अगदी साध्या व पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम पार पडले. तर भक्तगणांनी आपले घरी तिर्श्रीथ स्थापना, अखंड हरिनाम,हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, गजानन महाराज व भास्कर महाराज चरित्राचे पारायण, पुजापाठ, आरती व प्रसादादी कार्यक्रम कौटुंबिक स्तरावर भक्तीमय वातावरण साजरा केला आहे

गुरु-शिष्य परंपरेतील भक्तश्रेष्ठ भास्कर महाराजांना अडगांव बु नजिक द्वारकेश्वर क्षेत्री सद्गुरु श्री गजानन महाराजांनी स्वहस्ते समाधी दिली होती. माऊली ज्ञानेश्वर महाराजानंतर संजीवन समाधी असलेले हे दुसरे तिर्थक्षेत्र म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्यसाधारण महत्व आहे. भाविकांनी आपले निवासी पुण्यतिथी साजरी करुन आपला भक्तीभाव प्रगट केला. ही निस्सिम श्रद्धा अलौकिक आहे अशा शब्दात प्रतिक्रीया श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी व्यक्त करुन या गुरु शिष्य परंपरेला उजाळा दिला.