esakal | हजारोंच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात कोरोनाचं संकट गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

Thousands of migrants face severe Corona crisis in rural areas
  • कोरोना बाधित पुणे आणि मुंबई शहरात सुरुवातीच्या काळातच लॉकडाऊन सुरू झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात परतले. त्यानुसार १६ हजार ७१ नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. या नागरिकांच्या तपासणीसाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि ट्रॅव्हल पॉईंटवर पथके तैनात करण्यात आली होती.

हजारोंच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात कोरोनाचं संकट गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध देशांमध्ये असलेले तब्बल १६ हजार ७१ नागरिक अलिकडच्या काळात जिल्ह्यात परतले आहेत. यामध्ये विदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या ही ११८ असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी ११८ जणांची वैद्यकीय तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात परतलेल्या १६ हजार प्रवाशांपैकी १५ हजार ९०९ ज जणांची तपासणी करण्यात आली आहे. तेव्हा या परतलेल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचे कोरोनाचे लक्षणं जरी नसले तरी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, काही दिवस घरातच रहावे, अन्यथा या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही होऊ शकतो.

कोरोना बाधित पुणे आणि मुंबई शहरात सुरुवातीच्या काळातच लॉकडाऊन सुरू झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात परतले. त्यानुसार १६ हजार ७१ नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. या नागरिकांच्या तपासणीसाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि ट्रॅव्हल पॉईंटवर पथके तैनात करण्यात आली होती. याशिवाय अनेकांच्या घरी जाऊनही महापालिकेच्या पथकाने तपासणी केली. एकूण प्रवाशांपैकी विदेशातून परतलेल्या ११८ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यापैकी ४४ जणांना गृह विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला आहे. तर, ८२ जणांनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे.

हजारोंच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात कोरोनाचं संकट गंभीर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर असंघटित क्षेत्रातील लाखो नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पोटापाण्यासाठी शहरांमध्ये आलेल्या या नागरिकांनी थेट आपले गाव गाठण्यासाठी धाव घेतल्याने आता ग्रामीण भागात कोरोनाचे संकट गडद होत आहे. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आता निर्माण झाला आहे.

नागरिक करतायेत पायपीट
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. मात्र, शेवटच्या घटकांची यातून काय परस्थिती होईल, याचा विचार केलेला दिसत नाही. राज्यभर संचारबंदी लागू असून, यामध्ये सर्व एसटी वाहतूक, सामान्यांना पेट्रोल देणे बंद केले आहे. त्याची झळ ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावी लागत आहे. शहराजवळ गाव आहे, त्यांना पाच ते सात किलोमीटरची पायपीट करुन अत्यावश्‍यक सुविधा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

परतलेल्यांमुळे गावातील नागरिक दहशतीत
मुंबई, पुणे आणि इतर शहरातील परतलेल्या नागरिकांची संख्या १५ हजाराच्या जवळपास गेली आहे. या सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. मात्र, या परतलेल्या प्रवाशांमुळे गावातील नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत. या प्रवाशांमुळे गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी त्यांना एकतर शेतात नाही तर घरातच रहावे असे आवाहन गावातील सरपंचासह अनेकजण करीत आहेत.

अशी आहे आतापर्यंतची स्थिती
विदेशातून आलेले एकूण प्रवासी -११८
पुणे, मुंबईवरून आलेले प्रवासी- १६ हजार ७१
स्क्रिनिंग झालेले विदेशी प्रवासी - ११८
स्क्रिनिंग झालेले पुणे-मुंबईचे प्रवासी-१५ हजार ९०९
विदेशातून आलेल्यापैंकी होम क्वारंटाईन- ४४
होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करणारे-८२

loading image