PM Kisan Yojana
PM Kisan Yojanasakal

PM Kisan Yojana: ‘किसान सन्मान’ला मुकले सात हजारांवर शेतकरी; विसावा हप्ता मिळालाच नाही, तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

Buldhana Farmers: शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पण तांत्रिक कारणांमुळे ७,१९९ शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळालेला नाही.
Published on

बुलडाणा : शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात. योजनेचा २०वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील ७ हजार १९९ शेतकरी हप्त्याला मुकले आहेत. ई-केवायसी नसणे, आधार सिंडींग नसणे आणि इतर तांत्रिक कारणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com