new born baby death
sakal
तिरोडा (जि. गोंदिया) - तालुक्यातील जमुनिया येथील कोडापे परिवारावर मंगळवारी (ता. १) दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या तीन दिवसांच्या नवजात बाळाचा उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाळाच्या आईवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.