esakal | वर्धा : कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

wardha accident

वर्धा : कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळेगाव शा. पं. (जि. वर्धा) : जिल्ह्यातील चिस्तुर (chistur wardha) गावाजळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात (car accident talegaon wardha) झाल्याची घटना घडली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले. गाडीचा अक्षरशः चुराडा होऊनही एकजण सुखरूप वाचला आहे. (three died in car accident in talegaon of wardha)

हेही वाचा: दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

अमित गोयते (वय ३२ वर्ष, रा. बडनेरा), शुभम गारोडे (वय ३५, रा. अमरावती), आशिष माटे (रा. राजुरा), असे मृतांचे नावे असून शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे. चौघेही चारचाकीने प्रवासाला निघाले होते. चिस्तुर गावाजवळ पोहोचताच वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार गाडी रस्त्याच्या कडेला असणारे मोठे पळसाचे झाड तोडून बाजूला फेकली असावी. हा अपघात इतका भीषण होता की, एकाचा मृतदेह झाडावर अडकला होता, तर दुसरा गाडीत होता. तिसरा मृतदेह गाडीच्या शेजारी पडला होता. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे, श्याम गहाट, राहुल अमोने, अनिल चिलघर, देवेंद्र गुजर, विजय उईके दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

loading image
go to top