esakal | नैसर्गिक सौंदर्य, सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी गेले अन् मिळाली जलसमाधी
sakal

बोलून बातमी शोधा

Three drowned in Bhandara, Gondia district

गुरुवारी सौंदड (जि. गोंदिया) परिसरातील सात ते आठ युवक मौजमजा करण्यासाठी येथे आले. ते सर्व आंघोळ करण्यास तलावात गेले. पाण्यात मजा करताना खोलीचा अंदाज न आल्याने नीतेश सूर्यवंशी व अमर कुंभरे पाण्यात बुडू लागले. त्यांना पाण्यात बुडताना पाहून इतर मित्र काठाकडे पळून गेले.

नैसर्गिक सौंदर्य, सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी गेले अन् मिळाली जलसमाधी

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

नागपूर : भंडारा आणि गोंदियातील दोन घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणीबांध तलावात दोन युवक बुडाले तर गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील बाघ नदीत बुडून एका मुलाचा मृत्यू झाला.

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्‍यातील शिवनीबांध तलावात बुडून दोन युवकांचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. सात ते आठ मित्र या तलावात पोहण्यासाठी आले असताना ही घटना घडली. मृतांची नावे नीतेश धनीराम सूर्यवंशी (वय २०, रा. सौंदड) आणि अमर शामराव कुंभरे (वय २०, रा. श्रीरामनगर) अशी आहेत. हे दोघेही आयटीआयचे शिक्षण घेत होते.

अधिक माहितीसाठी - मला लाच मागितली... आता मी काय करू?, तक्रार कुठे करू? सांगा

यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने तब्बल सात वर्षांनंतर शिवनीबांध तलाव तुडुंब भरले आहे. या परिस्थितीत परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांची गर्दी खेचून घेत आहे. त्यातच युवावर्गाला पाण्यात मनसोक्त डुंबणे व पोहण्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे जिल्ह्यातील दूरवरून दररोज शेकडो पर्यटक शिवनीबांधला भेट देत आहेत.

गुरुवारी सौंदड (जि. गोंदिया) परिसरातील सात ते आठ युवक मौजमजा करण्यासाठी येथे आले. ते सर्व आंघोळ करण्यास तलावात गेले. पाण्यात मजा करताना खोलीचा अंदाज न आल्याने नीतेश सूर्यवंशी व अमर कुंभरे पाण्यात बुडू लागले. त्यांना पाण्यात बुडताना पाहून इतर मित्र काठाकडे पळून गेले. जवळपास पोहणारे नसल्याने नीतेश व अमर यांना मदत मिळाली नाही. त्यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.

हेही वाचा - ...अन् तहसीलदारांनी एक दिवसासाठी चक्क कार्यालयच आणले गावात; कोण आहे तो सरपंच? काय आहे त्याचे सेवाकार्य? वाचा

शिवनीबांध जलतरण संघटना लाखनीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, कैलास लुटे, मारोती भुरे, प्रखर गुप्ता, जनार्दन दोनोडे, उमेश टेंभरे, मोरेश्‍वर डोये, मनोज वैद्य यांनी बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले. शिवनीबांध तलावावर पर्यटकांची गर्दी पाहता येथे पोलिस चौकीची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे