esakal | अमरावती : कार व दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : कार व दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार

अमरावती : कार व दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार

sakal_logo
By
शेखर चौधरी

मोर्शी (जि. अमरातवी) : मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर असलेल्या मधापुरी जवळील हनुमानजीच्या मंदिरा जवळच्या वळणावर मोटर सायकल क्रमांक एम एच २७ बी के ०९२० व इंडिका गाडी क्रमांक एम एच ३१ ईक्यू ०१९२ ची समोरा समोरा धडक झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. (three-people-killed-in-accident-accident-news-crime-news-Amravati-accident-news-nad86)

प्राप्त माहितीनुसार, अंबाडा येथील चिमाजी अमृत कोकरे (वय ५०), रामभाऊ रामू परते (वय ४५, रा. नळा, ता. आठणेर) व सुभाजी कोंडी कायदेकर (वय ५५, रा. मानी ता. आठणेर) हे तिघे मोर्शीवरून अंबाडा येथे मोटर सायकलने जात होते. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या इंडिका विस्टा क्रमांक एमएच ३१ ईक्यू ०१९२ गाडीच्या चालकाने मोटर सायकलला जोरदार धडक दिली.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

या अपघातात तिघेही दुचाकीवरून फेकल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तिघांनाही उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणण्यात आले डॉक्टरानी तिघांनाही मृत घोषित केले. इंडिका चालक मोहन ताहाड (रा. नागपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

(three-people-killed-in-accident-accident-news-crime-news-Amravati-accident-news-nad86)

loading image