रात्री अचानक कोसळली तीन मजली इमारत!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

अकोला : शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक परिसरात असलेली फक्त 45 वर्षांआधी बांधकाम झालेली इमारत अचानक कोसळली आणि परिसरात एकच तारांबळ उडाली. बुधवार रात्री एक वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे रात्रीच धावाधाव सुरू झाली. 
गांधी रोडवरील जुना कपडा बाजारमध्ये असलेल्या निर्मल स्वीट मार्टची तीन मजली इमारत बुधवारी (ता.1) रात्री सव्वा दहा वाजताच्या दरम्यान कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

जुने कपडे बाजारात धर्मेंद्र प्रभुदास खिलोशीया यांचे निर्मल स्वीट मार्टचे 1975 मधील बांधकाम असलेली तीन मजली इमारत आहे. इमारतीच्या शेजारी शू मॉल आहे. शू मॉल मालकाने काही दिवसांपूर्वी नवीन दुकानाच्या बांधकामासाठी बुलडोझरने तेथे खोदकाम केले होते; मात्र त्या खोदकामाचा परिणाम स्वीट मार्ट इमारतीवर होणार असल्याने स्वीट मार्टचे मालक धर्मेंद्र प्रभुदास खिलोसिया यांनी बांधकाम थांबवले होते, मात्र काही दिवसांनी पुन्हा शू मॉल मालकाने ड्रिल मशिनच्या साह्याने पंधरा ते अठरा फूट खोल खड्डे केले; त्यामुळे बेसहारा झालेल्या निर्मल स्वीट मार्ट ची तीन मजली इमारत रात्री कोसळली. 

हेही वाचा - वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाचा तडाखा

घटनास्थळावर यंत्रणा
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान, पोलिस व महावितरणचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तत्काळ विद्युत पुरवठा खंडित करून इमारतीखाली कोणी दबले आहे का याची शहानिशा केली मात्र कुणीही दबले नसल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

स्वीट मार्टच्या मालकांनी गाठले पोलिस ठाणे
घटना घडल्यानंतर काही वेळेनंतर निर्मल स्वीट मार्टचे मालक आणि इतर काही व्यापाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले होते. यावेळी बाजूच्या शू-मॉल मालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three-storey building collapsed at night in akola!