विदर्भात गुरुवारपासून पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पश्चिम आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या परस्पर विरोधीक्रियेमुळे गुरुवारपासून (ता.२४) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावर येणारे उष्ण व बाष्पयुक्त वारे यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तीव्र पश्चिमी चक्रावाताच्या स्थितीचा प्रभाव पुढील दोन दिवसांत जम्मू - काश्मीर आणि हिमालयाकडे वाढणार आहे. वायव्य भारतात जमिनीलगत जोरदार वारे वाहणार असून, पंजाब, हरियाना, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस गारपीट होणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही गुरुवारपासून (ता.२४) गारपिटीचा इशारा देण्यात आला असून, विदर्भासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह कमी असून, बंगालच्या उपसागरावरून राज्याकडे वारे वाहत असल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया येथे गारठा कायम असून, उर्वरित राज्यात थंडी कमी झाली आहे.   सोमवारी (ता. २१) नागपूर येथे ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने पुढील काही दिवस राज्यात किमान तापमानात वाढ होणार आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.६(०.३), जळगाव १२.६ (०.७), कोल्हापूर १६.५(१.५), महाबळेश्‍वर १४.५(१.१), मालेगाव १४.२ (३.५), नाशिक १२.३, सांगली १२.४ (-१.९), सातारा ११.५ (-१.७), सोलापूर १४.९(-१.३), सांताक्रूझ १८.२(१.०), अलिबाग १८.७ (१.२), रत्नागिरी १८.२ (१.०), डहाणू १७.२ (०.१), आैरंगाबाद १३.० (०.७), परभणी ११.० (-३.४), नांदेड १३.० (-०.९), अकोला १२.५ (-१.९), अमरावती १३.६ (-१.२), बुलडाणा १६.१ (१.१), चंद्रपूर १३.०(-२.३), गोंदिया ९.६ (-३.५), नागपूर ८.१ (-५.६), वर्धा ११.१ (-२.७), यवतमाळ १५.० (-०.४).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thursday rain forecast in Vidarbha