esakal | वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला अवाक्
sakal

बोलून बातमी शोधा

tiger attack on farmer in dhanaki of yavatmal

शेतकरी मोहन झोपेत असतानाच हल्ला करीत त्याच्या डोक्‍याल्या पकडून पाच फुट फरफटत नेत होता. तितक्यात मोहनसोबत जागलीवर असलेल्या बंटी नावाच्या कुत्र्याने मालकाचा आवाज ऐकला.

वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला अवाक्

sakal_logo
By
संजय भोसले

ढाणकी (जि. यवतमाळ) :  पैनगंगा अभयारण्यालगतच्या जेवली मथुरानगर शिवारात गुरांच्या संरक्षणासाठी रात्री जागलीला गेलेल्या मोहन अमरसिंग टाकडा (वय 48, रा. जेवली मथुरानगर) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्यात शेतकरी मोहन जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.10) पहाटे चारच्या सुमारास घडली. 

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

शेतकरी मोहन झोपेत असतानाच हल्ला करीत त्याच्या डोक्‍याल्या पकडून पाच फुट फरफटत नेत होता. तितक्यात मोहनसोबत जागलीवर असलेल्या बंटी नावाच्या कुत्र्याने मालकाचा आवाज ऐकला. मोहनच्या डोक्याला धरून ओढत असलेल्या वाघाच्या पाठीवरच हल्ला केला. त्यामुळे वाघाने पळ काढल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला. वाघाने हल्ला केल्याचे कळताच वनरक्षक अनंत सानप व एस. पी. मानकर घटनास्थळी पोहोचले. मोहनला ढाणकी रुग्णालयात दाखल केले. मोहनच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने यवतमाळ रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या भागात नेहमीच वाघाचा वावर  असतो. त्यामुळे शेतकरी नेहमी दहशतीत असतात.

loading image
go to top