esakal | मालगाडीच्या धक्क्याने वाघाच्या बछड्याचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

A tiger calf dies after being hit by a freight train}

व्याघ्र प्रकल्पातील टी-१४ वाघीण आपल्या तीन पछड्यांसह रेल्वे रुळ ओलांडत असताना एक छाव्याला बल्लारशाहकडून गोंदियाकडे जाणाऱ्या मालगाडीची धडक बसली. यात त्याचा एक पाय कापल्या गेला व जागीच मृत्यू झाला.

vidarbha
मालगाडीच्या धक्क्याने वाघाच्या बछड्याचा मृत्यू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

गोरेगाव (जि. गोंदिया) : नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-१४ वाघिणीच्या एका पछड्याचा मालगाडीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावरील गोंगले-हिरडामालीदरम्यान उघडकीस आली. मृत पछड्याचे वय सहा महिन्यांचे आहे.

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गाची पूर्व दिश नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे अनेकदा वन्यजीव खाद्यान्न व पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडतात. असे करताना त्यांच्या जीविताला धोका राहत असून, यापूर्वी देखील वन्यप्राण्यांचा रेल्वेगाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाद्वारे सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या परिसरात वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास व्याघ्र प्रकल्पातील टी-१४ वाघीण आपल्या तीन पछड्यांसह रेल्वे रुळ ओलांडत असताना एक छाव्याला बल्लारशाहकडून गोंदियाकडे जाणाऱ्या मालगाडीची धडक बसली. यात त्याचा एक पाय कापल्या गेला व जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत छाव्याचा पाय घटनास्थळी आढळून आला नाही.

घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराजसिंह, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी आर. आर. सदगीर, नागझिरा अभयारण्याच्या उपसंचालिका पूनम पाटे, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, गोरेगाव विभागाचे क्षेत्र सहायक धुर्वे, स्वप्निल दोनोंडे आदी घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा पंचनामा केल्यावर मृत पछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून कापलेल्या पायाचा शोध वनविभागाद्वारे घेतला जात आहे.