अखेर तीन बळी घेणारा तो वाघ जेरबंद!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

नागभीड आणि तळोधी वनपरिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता. नागभीड वनपरिक्षेत्रात दोघांना, तर तळोधी वनपरिक्षेत्रात एकास ठार केले होते. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. मात्र, वाघाच्या भीतीमुळे शेतीची कामे ठप्प पडली होती. वाघाला जेरबंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी वनविभागाकडे केली होती.

नागभीड, तळोधी(जि. चंद्रपूर) :वन्यजीव आणि मानव संघर्ष अलिकडे अतीशय वाढला आहे. याला मानवाचे जंगलावरचे अतिक्रमण जबाबदार आहे. की आणखी काही कारणे आहेत, याविषयी उहापोह होत सततच उहापोह होत असला तरी ती समस्या सुटली नसून दिवसेंदिवस वाढतेच आहे.

नागभीड, तळोधी वनपरिक्षेत्रात महिन्याभरात तिघांचा बळी घेणाऱ्या वाघाला रविवारी (ता. 19) सायंकाळी वनविभागाच्या चमूने जेरबंद केले. तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 579 या परिसरात या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.

नागभीड आणि तळोधी वनपरिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता. नागभीड वनपरिक्षेत्रात दोघांना, तर तळोधी वनपरिक्षेत्रात एकास ठार केले होते. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. मात्र, वाघाच्या भीतीमुळे शेतीची कामे ठप्प पडली होती. वाघाला जेरबंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी वनविभागाकडे केली होती.

सविस्तर वाचा - आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे? दिव्यांगांचा जळजळीत प्रश्‍न

वाघाने 18 जुलै रोजी ओवाळा येथील शेतकऱ्यास गोविंदपूर बिटात ठार केले. चार जुलै रोजी सोनुर्ली बिटात शेतमजुराच्या नरडीचा घोट घेतला होता. तळोधी परिसरातही एका शेतकऱ्यास वाघाने ठार केले होते. या वाघाचे शेतकऱ्यांवर सातत्याने हल्ले सुरूच होते. त्यामुळे वाघाला पकडण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून वनविभागाची या परिसरात मोहीम सुरू होती. 19 जुलै रोजी वाघाला पकडण्याची परवानगी वनविभागाला मिळाली. त्यानंतर रविवारी गोविंदपूर उपवनक्षेत्रात वाघ दिसताच त्याला बेशुद्ध करण्यात आले. आणि आता वाघाला गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger caught by forest department