चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Tiger Found Dead in Chandrapur : या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे.
Tiger Found Dead in Chandrapur

Tiger Found Dead in Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिकली चक क्रमांक २ (ता. मूल) येथील बिगर वनक्षेत्रात एका प्रौढ नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. हा वाघ अंदाजे ६ ते ७ वर्षे वयोगटातील असून त्याचा मृत्यू सुमारे एक दिवसापूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com