esakal | अमरावती : पुसला गावात वाघाचे दर्शन; रोहीची शिकार
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : पुसला गावात वाघाचे दर्शन; रोहीची शिकार

अमरावती : पुसला गावात वाघाचे दर्शन; रोहीची शिकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : रविवारी सकाळच्या सुमारास पुसला शेतशिवारात वाघोबाचे दर्शन व पावलांचे ठसे आढळून आले. तसेच तेथून सात किमी अंतरावरील एकलविहीर परिसरातील शेतात बाराशिंगी रोहीचा फडशा पडल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्याठिकाणी दिसून आलेल्या पावलांवरून वाघाने हल्ला करून रोहीची शिकार केली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज असून वनविभाग तपास करीत आहे.

आज (ता. पाच) सकाळच्या सुमारास पुसला येथील स्वप्नील मांडळे हे लोहदरा शिवारातील शेतात गेले असता त्यांना वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्याबरोबरच वाघाची डरकाळी ऐकू आली. शेतातील एका बाजूस पट्टेदार वाघ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुसला गावापासून सात किमी अंतरावर असलेल्या एकलविहीर येथे दुपारच्या सुमारास सुरेंद्र परिहार यांच्या शेतात एका रोहीची शिकार झाल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

दिसून आलेल्या पाऊलखुनांवरून ही शिकार वाघानेच केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत कपिल परिहार यांनी वनविभागाला माहिती दिली. या दोन्ही घटनामुळे एकलविहीर व पुसला परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top