दहशत : शौचास गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

राजुरा शहराला लागून असलेल्या वनक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांना सावध राहण्याबाबत वनविभागाची जनजागृती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी इंदिरानगर वस्तीला लागून असलेल्या वनात मंगेश कोडापे शौचाला गेला होता. त्याच वेळेला तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.

राजुरा (जि. चंद्रपूर) : शौचास गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बुधवारी (ता. 25) दुपारी बाराच्या सुमारास घडली. मृताचे नाव मंगेश कोडापे आहे. शहरालगत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 155 परिसरात ही घटना घडली.

राजुरा शहराला लागून असलेल्या वनक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांना सावध राहण्याबाबत वनविभागाची जनजागृती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी इंदिरानगर वस्तीला लागून असलेल्या वनात मंगेश कोडापे शौचाला गेला होता. त्याच वेळेला तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
 
हेही वाचा - आता चिअर्सला नोंद लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरानजीकची घटना
बराचवेळ लोटूनही मंगेश परत आला नाही. त्यामुळे परिसरातील युवकांनी पाहणी केली असता, मंगेशचा मृतदेहच आढळून आला. राजुरा तालुक्‍यात मागील महिन्यापासून वाघाची दहशत आहे. तालुक्‍यातील मूर्ती येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला होता. चिचबोडी येथे वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले होते. 50 वर्षांची परंपरा असलेली जोगापूरची यात्रा वाघाच्या दहशतीमुळे स्थगित केली गेली. अशात वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतल्याने भीती पसरली आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जाणून घ्या - 72 वर्षांनंतरही होता काळोख, आता सौरदिव्यांनी उजळले हे गाव

दोन दिवसांतील दुसरी घटना
वाघाने हल्ला करून माणसाला ठार मारण्याची ही जिल्ह्यातील दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. मंगळवारी (ता. 24) नागभीड तालुक्‍यातील मिंडाळा येथील सुलोचना हरी चौधरी नावाच्या महिलेलासुद्धा वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्या शेतात काम करीत असताना ही घटना घडली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger killed youth in chandrapur district