वाघाने केली शेतकऱ्यांची कालवड फस्त

 राजेश सोळंकी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

आर्वी : तालुक्यातील बेढोंना शिवारात वाघाने कालवडी वर हल्ला करून ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्वी : तालुक्यातील बेढोंना शिवारात वाघाने कालवडी वर हल्ला करून ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी (ता. 17) रात्री कालवड शेतातून घरी परतली नाही म्हणून इमाने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता शनिवारी सकाळी (ता. 18) देवी तलाव या कच्च्या रस्त्यावर सकाळी कालवड वाघाच्या हल्ल्यात मृत झाल्याचे दिसून आले अंदाजे 22 ते 25 हजार किमतीची ही कालवड होती.
 
या घटनेची माहिती बेढोंना परिसर वनविभागाचे राउंड ऑफिसर मुळे यांना देण्यात आली  त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली  शेतकऱ्याला वनविभागाच्या मार्फत भरपाई  देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र वाघ आला रे आला अशी दशहत या गावात निर्माण झाली आहे. 

 

Web Title: Tigers made the farmers' calf