Tigress Captured
sakal
शिरजगावकसबा - चांदूरबाजार तालुक्यात सोनोरीत रविवारी (ता. ६) युवतीला व सोमवारी (ता. ७) शिरजगावकसबा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर झडप घेऊन ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वनविभागाने सुरू केलेल्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ट्रँक्विलायझर गनचा वापर करून बंदिस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.