esakal | जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळा होणार कमी: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

बोलून बातमी शोधा

Timings of essential shops will get reduced in Amravati }

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाकडून 22 फेब्रुवारीपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक बाबींसाठी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळा होणार कमी: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सध्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीसाठी सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा नागरिक बेजबाबदारीने वागताना दिसत आहेत. त्यामुळे दुकानांची वेळ कमी करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.24) संकेत दिलेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाकडून 22 फेब्रुवारीपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक बाबींसाठी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण उगीचच भाजीपाला, किराणा तसेच औषधी खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरतात, असे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत...

त्यामुळे आता सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंतच मुभा देण्याबाबत प्रशासन विचार करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लपविण्याबाबतच्या आरोपाचा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. जी वास्तविकता आहे तीच समाजासमोर आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी 100 सॅम्पल्स पाठविले

सद्यःस्थितीत शासकीय आणि खासगी आयसीयूमध्ये कोरोनाचे जवळपास 275 रुग्ण ऑक्‍सिजन तसेच माइल्ड ऑक्‍सिजनवर आहेत. त्यामुळे कोरोना नाहीच, असा दुष्प्रचाराला कुणी बळी पडू नये. वास्तविक परिस्थिती कोविड रुग्णालयात गेल्यावरच माहिती पडते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - लग्न सुरू असतानाच वधू म्हणाली ‘मला शिक्षण पूर्ण करू...

"रॅकेट'च्या दाव्यात तथ्य वाटत नाही

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात येत असल्याचा मुद्दा जिल्हापरिषदेच्या सभेत उपस्थित करण्यात आला होता. मात्र विमा कंपन्यांच्या अटी व शर्ती पाहता या मुद्यात तथ्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही प्रमाणात एखादी केस झाली असेल, मात्र सरसकट कोरोनाचे रॅकेट सक्रिय आहे, असे वाटत नाही. कोरोना नाहीच असा अपप्रचार करणे चुकीचे आणि धोकादायक ठरेल, असा इशारासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

संपादन - अथर्व महांकाळ