पूर ओसरतोय! अनारोग्याचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

मिलिंद उमरे
Saturday, 5 September 2020

पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरलेली आहे. तसेच डास, मृत जनावरे, इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
प्रशासनाकडून गावात निर्जंतुकीकरण फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकणे, नालीमध्ये औषध टाकणे, आरोग्य शिबिरे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पूरपश्‍चात विविध आजार पसरू न देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील ७ दिवस प्रत्येक पूरग्रस्त भागात गावस्तरावर आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरलेली आहे. तसेच डास, मृत जनावरे, इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
प्रशासनाकडून गावात निर्जंतुकीकरण फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकणे, नालीमध्ये औषध टाकणे, आरोग्य शिबिरे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सावंगी, आमगाव, हनुमाननगर, वघाळा, डोंगरसावंगी, चुरमुरासह नजीकच्या गावांमध्ये याबाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.

दुषित पाण्यामुळे होणारे रोग आटोक्‍यात आणण्यासाठी
*सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे
* त्यांचे क्‍लोरिनेशन करणे आवश्‍यक आहे.
*घरातील पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिणे आवश्‍यक आहे.
*उघड्यावरील पुराच्या पाण्यामुळे डास प्रजनन प्रक्रिया वाढते.
*डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उघड्यावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे
* प्रतिबंधात्मक पावडरची फवारणी करणे गरजेचे आहे.
*डास चावू नये म्हणून मच्छरदाणीचा उपयोग केल्यास ते फायदेशीर ठरू शकते.
*सर्पदंशापासून सावधानता बाळगावी.
*पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सर्प किंवा अन्य कीटकांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्यापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.
*पुरानंतर अस्वच्छता वाढली असल्याने नागरिकांनी शौचालयाचा वापर करून उघड्यावरील हागणदारी बंद करणे आवश्‍यक आहे.
* गावस्तरावर आरोग्य विभागाची तपासणी शिबिरे लावण्यात आली आहेत.
*स्व परीक्षण करत असताना ताप, खोकला, पोट दुखणे, जुलाब असे आजार अंगावर काढू नये.
*पुराच्या पाण्यात भिजलेल्या कुमकूवत घरात व इमारतीमध्ये आश्रय घेणे टाळावे.

सविस्तर वाचा - बापरे! अकरावीचे इतके विद्यार्थी गेले कुठे? प्रवेशासाठी तब्बल इतक्या जागा रिक्त

ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची
या उपक्रमात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची असून पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागातील अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील नागरिकांमध्ये पूर पश्‍चात उद्‌भवणाऱ्या रोगांबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय दवंडी देणे, सूचना फलकावर माहिती देणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पूरबाधितांना भेटून माहिती देणे गरजेचे आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips for good health after flood