Truck Accident: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना
Fatal Truck Accident in Tiroda: तिरोडा येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी धर्मेंद्र कुंडलीक उदापुरे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक पसार असून पोलिस तपास करत आहेत.
तिरोडा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास येथील सब्जी मंडीसमोरील रस्त्यावर घडली. धर्मेंद्र कुंडलीक उदापुरे (वय ४८, रा. मेंढा) असे मृताचे नाव आहे.