
tragic incident in Tirora Father and son electrocuted
esakal
तिरोडा (जि. गोंदिया), ता. २३ ः मोबाईल चार्जिंगदरम्यान विद्युत शाॅक लागून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना येथील संत रविदास वाॅर्डात सोमवारी (ता. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.नरेश हरिदास बरियेकर (वय ५०) व दुर्रेश नरेश बरियेकर (वय २१, दोघे रा. संत रविदास वाॅर्ड, तिरोडा) अशी मृतांची नावे आहेत.