

Tiroda Hospital
sakal
सुबोध बैस
तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण (एक्स-रे) यंत्र अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. जुनी मशीन हटवून केंद्र शासनाच्या स्तरावर नवीन क्ष-किरण मशीन बसविण्यात आली असली तरी कंपनीकडून टेस्टींग न झाल्याने ती अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन क्ष-किरण काढावे लागते. यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.