Amravati School News : तिवसा येथील जि.प. शाळेची इमारत जीर्ण; दीडशे वर्षे उलटूनही नूतनीकरण नाही

पडक्या वर्गखोल्यांमुळे पटसंख्येवर परिणाम
tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other school
tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other schoolSakal
Updated on: 

तिवसा : शहरातील अगदीच राष्ट्रीय महामार्गा लागत असलेल्या तिवसा पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेला जवळपास दीडशे वर्ष उलटून गेली आहे. मात्र अजूनपर्यंत या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण झाले नाही,

परिणामी पालकांना देखील पडक्या शाळेत आपल्या काळजाच्या तुकड्याला पाठवायचे कसे हा प्रश्न पडतो आहे.त्यामुळे तातडीने शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

हळूहळू इंग्रजी शाळेमुळे जिल्हा परिषद शाळेचे महत्व कमी होत असल तरी आज ही ग्रामीण भागातील पालक हे मोठ्या आशेने आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतात परंतु सध्या सर्वीकडे शाळेच्या वर्ग खोल्याची परिस्थिती ही फार वाईट असून अनेक इमारती या जीर्ण झाल्या आहेत.

तिवसा शहरातील १८६८ पासून असलेल्या जिल्हा परिषद शाळेत आठ वर्ग खोल्या आहेत. ज्यामध्ये पहिली ते सातवी पर्यंतच शिक्षण दिल्या जाते मात्र यातील खोल्या अतिशय धोकादायक स्थितीत असून कधी शाळेच्या भिंती पडून दुर्घटना होईल हे सांगता येत नाही.

शाळेवरचे छप्पर नाही, भिंतीला तळे गेले, छप्परचे लाकूड सडले अश्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यात मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण द्यावे लागत आहे. अशातच कुठली दुर्घटना घडली आणि त्यात जीवितहानी झाली तर जबाबदार कोण असा ही सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other school
Amravati News:'ताज'मध्ये रुम बुक करण्यासाठी कस्टमर केअरला लावला कॉल अन् क्षणातच खात्यातून गायब झाले ४ लाख

पटसंख्येत सातत्याने घट

येथील तिवसा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात सुमारे ७६ जिल्हा परिषद शाळा असून यातील जास्त करून शाळेच्या वर्ग खोल्या या जीर्ण होऊन भिंती पडल्या, कुठे शाळेला छत नाही, एकाच वर्ग खोलीत अनेक मुलांना शिक्षण द्यावे लागत आहे. यामुळे शाळेच्या पटसंख्येवर देखील सातत्याने परिणाम होतो. यात २०२१ वर्षात शाळेत १६२,२०२२ मध्ये १४८ तर आता १२० पट संख्या आहे. त्यामुळे आता शासनाने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other school
Amravati News:'ताज'मध्ये रुम बुक करण्यासाठी कस्टमर केअरला लावला कॉल अन् क्षणातच खात्यातून गायब झाले ४ लाख

शाळेकडून आठ ही वर्ग खोल्याचे डिसमेंटल प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये चार वर्ग खोल्या डिसमेंटल मंजूर असून लवकरच त्याचे काम सुरु होईल अशी आशा आहे. परंतु अजूनपर्यंत कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.

- राजेंद्र नकाशे, मुख्याध्यापक.

गेल्या कित्येक वर्षापासून या शाळेच्या खोल्या या अतिशय धोकादायक स्थितीमध्ये असून त्या केव्हाही पडू शकतात अशी परिस्थिती सध्या तिवस्याच्या जिल्हा परिषद शाळेची आहे. त्यामुळे अशा जीर्ण झालेल्या शाळेत मुलांना कस पाठवावे हा विचार येतो. कुठलीही हानी झाली तर त्याची जबाबदारी कुणाची?

- दीपक पानबुडे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil statement on Gokul election
Karmala ZP School
Jadhav Guruji Transfer Sparks Protest In Malwadi Parents Threaten To Withdraw 77 Students From Zilla Parishad School
CJP founder Abhijit Dipke interacting with villagers during his inspection of a Zilla Parishad school in Ausa taluka, Latur district.
Marathi News Esakal
www.esakal.com